रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतूकी संदर्भातील नियमांत होणाऱ्या बदलांमुळे गेल्या २५ वर्षापासून माफक दरात प्रवासी सेवा देणाऱ्या आमच्या विक्रम मिनिडोअर टॅक्सी चालक मालक यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कारण नियमात बदल करताना सरकार पातळीवरून अनेक गोष्टींना अनुरूप पर्याय उपलब्ध करून न दिल्यामुळे सरकार पातळीवर नियमाची अंमलबजावणी व स्थानिक पातळीवर त्याचे काटेकोर पालन करणे कठीण झालेले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून संघटनेमार्फत व्यथा निवेदने, मार्चे, आंदोलने करून सरकार दरबारी पोहोचविण्याचा व न्याय मिळण्याचा प्रयत्न केला परंतू अद्याप पर्यंत समस्या दूर होणेकामी सरकार पातळीवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १२ ते १३ हजार सभासद विविध समस्यांपासून पिढीत आहे.
तीनचाकी सहा आसनी जुन्या परमिटवर चारचाकी सहा आसनी बदली वाहन बीएस ६ मानकातील वाहनाकरीता पर्यायी इंधन म्हणून सीएनजी वापरासाठी सीएनजी किट रेट्रो फ्लिपमेंट करण्यास मान्यता मुळे वयोमर्यादेनुसार डिझेलवर चालणारे जुने वाहन स्क्रॅप केल्यावर संबंधीत वाहन मालकाला बीएस ६ मानकातील पर्याची वाहन केवळ इको पेट्रोल ह्या इंधनावर चालणारे उपलब्ध आहे. त्यामुळे ते व्यावसायीक न परवडणारे वाहन आहे. त्यामुळे मारूती इको करीता सीएनजी किट रेट्रो फ्लिपमेंट करण्यास मान्यता मिळणे आवश्यक आहे. आता पर्यंत सदरची मान्यता न मिळाल्यामुळे अनेक वाहक मालकांचा व्यवसाय बुडालेला आहे. वयोमर्यादा अटीनुसार मालकाला जुने डिझेलवर चालणारे वाहन स्क्रॅप करावे लागत आहे. मात्र व्यावसायीक पृष्ट्या परवडणारे सीएनजी किट लावलेले मान्यताप्राप्त वाहन उपलब्ध नसल्यामुळे सुंदरचा वाहन मालक से वाहन व्यवसायाच्या दृष्टीने विकत घेऊ शकत नाही अशा दुहेरी कात्रीत वाहन मालक सापडला आहे.
सन २०१९ पासून दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे वाहने बऱ्याच कालावधी करीता बंद होती त्यानंतर प्रवाशांच्या कमतरतेमुळे व्यवसायावर परिणाम झाला होता त्यातच वेळोवेळी आलेला महापूर, चक्रीवादळ तुर्कीवादळ ह्यामुळे वाहनचांचे व शेतीचे नुकसान झाले होते मात्र सदर वाहनासंदर्भात असणारे शासकीय विविध टॅक्स विमा ह्याच्या कोणतीही माफी अगर सूट देण्यात आली नव्हती. त्यामुळे आरटीए व एमएमआरटीए क्षेत्रातील सर्व विक्रम / सिनीडोअर वाहनांना सरसकट (दोनवर्षे वयोमर्यादा वाढवून मिळणे.कोविंड 59 व्या महामारीमध्ये परवानाधारक तीनचाकी तीन आसनी रिक्षा धारकांना रु. १५०० सानुग्रह अनुदान देण्यात आले. मात्र महारीच्या काळात व्यवसाय बंद असताना देखील चिन आसनी रिक्षा चालका प्रमाणे विक्रम मिनीडोअर मॅजिक इको हे वाहन धारकानी सरकार दरवारी टॅक्स स्वरूपात मान्सूल जमा केला आहे असे असताना सरकार पातळीवर केवळ तीनचाकी तीन आसनी रिक्षा चालकाना रु १५०० सानुग्रह अनुदान देऊन सहानुभूती। दाखविण्यात आली परंतु त्यांच्याप्रमाणे प्रवासी सेवा देणान्या आमच्या विक्रम, मिनिडोअर मॅजिक इको मालक चालकांना वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला, तीनचाकी - सहा आसनी विक्रम / मिनिडोअर ऑटोरिक्षा संवर्गात असल्याने व्यवसाय कर माफ होता शासन अधिसुचना क्र. एमव्हीआर २१३ / प्र.क्र.६.३/परि-२, दि. ०४/०१/२०१७ नुसार जुन्या ऑटो रिक्षा ऐवजी चारचाकी सहा आसनी वाहन शिवग्रामीण योजने अंतर्गत परवान्यावर नोंदविण्यास परवानगी असून चारचाकी मिटर टॅक्सीला व्यवसाय कर लागू आहे. सदर मुळ व्यवसाय कराचा भरणा करण्यास टॅक्सी चालक तयार आहेत मात्र त्यावरील व्याज पूर्णतः माफ करण्यात याव शासनाकडून वेळोवेळी करा सदर्भात करण्यात येणाऱ्या बदलाची अंमलबजावणी व त्याची माहीती सबंधीताना त्या त्या वेळेस देणे हे संबंधीत कार्यालयाचे काम आहे परंतू व्यवसाय करा सदर्भात अशी कोणतीही माहीती न देता अगर वेळोवेळी वाहन पासिंग करताना त्याची वसूली न करता आता त्यावर चक्रवाढ व्याज तावून त्याची वसूली करणे हे चालक मालक याना नाहक आर्थिक भूदंड देऊन त्यांच्यावर अन्यायकारक आहे.
रायगड जिल्हातील आरटीए व एमएमआरटीए क्षेत्राचा विचार करता भौगोलिक व व्यावसायीकदृष्या कोणतीही तफावत नाही असे असताना भौगोलिक व व्यावसायीकदृष्या समान असमान्य रायगड जिल्ह्यातील एमएमआरटीए या कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवाना हस्तांतरण करताना आकारण्यात येणारे शुल्क रु २५०००/- एवढे आहे. हे वस्तुस्थितीला धरून नाही. मात्र अशा वेळेस आरटीए रायगड क्षेत्रातील परवाना हस्तातरण शुल्क रु. ५०००/- एवढेच आहे. ज्यामुळे रायगड जिल्ह्यातील भौगोलिक व व्यावसायीकदृष्या विचार करता आरटीए व एमएमआरटीए ह्या दोन्ही क्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील क्षेत्रातील परवाना हस्तांतरण शुल्क ५००० एवढे घेण्यात यावे.केंद्र सरकारने १५ वर्षावरील वाहनांचे नुतनीकरण करणेसाठी पर्यावरण कर भरून री रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक केलेले आहे. री रजिस्ट्रेशन करण्यास विलंब झालेल्या वाहनांना कमीतकमी रूपये ४,३००/ ते ६,०००/- पर्यंत दंड आकारणी करून प्रमाणपत्र दिले जात आहे परंतू अगोदरच कोवीड तसेच वेळोवेळी आलेले महापूर, वादळे यामुळे व्यवसाय पूर्णपणे कोलमडलेला होता. तसेच घराचे देखील मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात सदरच्या दंडामुळे अतिरिक्त आर्थिक भुर्दंड वाहन चालक मालकांना सोसावा लागत आहे. ह्या गोष्टीचा विचार करून विशेष बाब म्हणून दंड माफ करण्यात यावा.रायगड जिल्ह्यात पेण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. रायगड जिल्ह्याचे क्षेत्र हे शेकडो किलोमीटरने पसरलेले आहे. त्यामुळे महाड, पोलादपूर, श्रीवर्धन येथून येणाऱ्या वाहनांना सुमारे १२० किलोमीटर प्रवास करून आर.टी.ओ. च्या कामकाजा करीता यावे लागते. या बाबत महाड किंवा मागणागव येथे मध्यवर्ती ठिकाणी पासिंग ट्रॅकची व्यवस्था करणेकामी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. परंतू त्यास मंजूरी देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे युध्दपातळीवर त्यास मंजूरी मिळणे आवश्यक आहे.
आमच्या सांख्या कष्टकरी गोरगरीत टॅक्सी चालकांच्या दृष्टीने न्यायीक निर्णय होणेकामी आमच्या समस्यांचे गांभिर्य जाणून घेऊन आपण आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून न्याय द्यावा
अशी मागणी रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर चालक मालक संघाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.