केंदूरमध्ये जमिनीच्या वादातून भावाकडून चुलत बहिणीचा खून
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिरूर तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून अनेक लहान मोठ्या घटना घडत असताना केंदूर येथील महादेव वाडी मध्ये चुलत भावाने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचा कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली असून आशा भागोजी साकोरे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव तर विलास यशवंत साकोरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
केंदूर ता. शिरूर येथील महादेववाडी मधील विलास साकोरे व त्याची चुलत बहीण आशा साकोरे यांच्यात जमिनीच्या वाटपातून वाद सुरू होते, अनेक दिवस वाद सुरू असल्याने आज सायंकाळच्या सुमारास आशा ही महिला घरासमोरील रस्त्याने जात असताना विलास साकोरे हा सदर ठिकाणी कोयता घेऊन आला आणि आशाच्या डोक्यात व अंगावर वार केले यावेळी आशा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मयत झाली, सदर घटनेत आशा भागोजी साकोरे रा. महादेव वाडी केंदूर ता. शिरूर जि. पुणे या महिलेचा मृत्यू झाला असून
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, वैभव स्वामी, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवलदार शिवाजी चितारे, पोलीस नाईक विशाल देशमुख, आत्माराम तळोले, राहुल वाघमोडे, अमोल दांडगे, किशोर शिवणकर, प्रताप कांबळे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीने खून करणाऱ्या विलास यशवंत साकोरे रा. महादेव वाडी केंदूर ता. शिरूर जि. पुणे यास ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी केली असता जमिनीच्या वादातून सदर खून केल्याची कबुली त्यांनी दिली तर रात्री उशिरा पर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहेत.