कासारीच्या उपसरपंचपदी रोहिणी रासकर बिनविरोध
आकाश भोरडे
तळेगाव ढमढेरे,प्रतिनिधी:
कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी रोहिणी दत्तात्रय रासकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत पवार यांनी दिली आहे.
कासारी ता. शिरुर येथील ग्रामपंचातचे उपसरपंच गोपाळ भुजबळ यांनी त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी वसंत पवार यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली यावेळी सरपंच सुनिता भुजबळ, मावळते उपसरपंच गोपाळ भुजबळ, किरण रासकर, गणपत काळकुटे, स्वाती नवले, रोहिणी रासकर, स्नेहल भुजबळ हे उपस्थित होते, दरम्यान उपसरपंच पदासाठी रोहिणी रासकर यांनी अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने रोहिणी रासकर यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत पवार यांनी जाहीर केले, तर निवडीनंतर माजी पंचायत समिती सदस्य राजाभाऊ भुजबळ, लोकनियुक्त सरपंच सुनीता भुजबळ, मावळते उपसरपंच गोपाळ भुजबळ, माजी सरपंच गुलाब सातपुते, सुखदेव भुजबळ, विष्णुपंत नरके, अशोक फुलावरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय रासकर, सोसायटीचे संचालक विजय सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष तबन भुजबळ यांसह आदींच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी रासकर यांचा सन्मान करण्यात आला तर निवडी नंतर बोलताना गावातील सर्व ज्येष्ठांना बरोबर घेऊन गावचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी रासकर यांनी सांगितले.
कासारी (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवडीबद्दल उपसरपंच रोहिणी रासकर यांचा सन्मान करताना पदाधिकारी.