हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत सूक्ष्म , लघु व मध्यम उद्यमा करता केंद्र व राज्य व शासनांच्या योजनांची माहिती , नविन व जुन्या उद्योगांची उभारणी करता शासनांच्या योजना , बँकेच्या कडून मिळनारे कर्ज सुलभतेने कसे मिळेल ह्या शिवाय अनुदानांचे स्वरूप कसे असतात ह्या बद्दल ह्या विषयातील तज्ञ भारतीय जैन सशघटनेचे राष्ट्रीय मार्गदर्शक श्री निरंजनजी जुवाजी ह्यांनी अत्यंत अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्रजी पापळकर हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून भा.जैन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री हस्तीमलजी बंब , जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक श्री कादरी हे उपस्थीत होते.

 ह्या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर ह्यांनी हिंगोली जिल्हा हा नाविकास जिल्हा म्हणून राज्यात ओळखाला जातो ह्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग धंदे उभारण्यास वाव असुन उद्योजक , व्यापारी , तरूणांनी पुढे यावे राज्य व केंद्र शासनाने अनेक योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असे अव्हान करून बँकानी पण ह्यात सहकार्य करावे असे सांगितले पण जिल्ह्यातील कर्ज घेतलेल्या उद्योजकांनी बँकेचे कर्ज परत फेड करण्यात मागे असल्या बद्दल खंत व्यक्त केली तसेच नविन उद्योग उभारण्यात कांही अडचणी येत असतील तर त्या निश्चितच सोडविल्या जातील ह्याची ग्वाही दिली. 

 जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक श्री कादरी ह्यांनी नविन उद्योजक , युवक , व्यापारी ह्यांना उद्योग नोंदणी पासून उभारणी पर्यंत च्या सर्व प्रक्रीयेत जिल्हा उद्योग केंद्रा कडून तत्परतेने मदत केली जाईल असे सांगितले .

 ह्या प्रसंगी हस्तीमलजी बंब ह्यांनी भारतीय जैन संघटनेच्या देशसेवेतील योगदाना बद्दल माहिती देवून राष्ट्रीय अपत्तीत अनेक प्रकल्प राबवीले असल्या बद्दल सांगितले . कार्यक्रमाचे संयोजक

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री गजाननराव घुगे, नंदकिशोर तोष्णीवाल , भारतीय जैन संघटनेचे श्री प्रकाश सोनी , ओमप्रकाश देवडा पिपल्स को. बँकेचे अध्यक्ष श्री सुनील देवडा ह्यांचे सह सुरेशचंद्र संचेती, कुलदीप माष्ट, मिलिंद यम्बल, चंद्रशेखर कान्हेड, ॲड. मनीष साकले, दीपक सावजी, अतुल बुर्से, राहुल मेने, नंदकिशोर सारडा ,नरेंद्र दोडल, विनोद मुथा, महावीर बडेरा, प्रसन्ना बडेरा, dr प्रेमेंद्र बोथरा, आनंद सातपुते, किशोर सोनी, निश्चल यंबल, प्रवीण झांझरी, प्रवीण सोनी, शैलेश कान्हेड, सौ. वंदनाताई सोवितकर, सौ.ममताताई काले राजकुमार बड़जाते,मयूर सोनी, आदिनी कार्यक्रम यशस्वीते करता प्रयत्न केले. कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातुन डॉक्टर, CA, वकील, व्यापारी,उद्योजक, युवा वर्ग एवम महिला मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रास्तावीक श्री अवचार ह्यांनी केले तर आभार श्री प्रकाश सोनी ह्यांनी मानले.