शिऊर पोलिसांची कारवाई

 वैजापूर

___________________________________

तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमानतपुरवाडी येथे एकाने कपाशीच्या शेतात गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. याप्रकरणी शिऊर पोलिसांच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून सुमारे १२ किलो ३०० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत. या गांजाचे बाजारभावाने किंमत ७४ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश भागिनाथ त्रिभुवन या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे ठाण्याच्या हद्दीत असताना त्यांना अमानतपुरवडी येथे एका शेतकऱ्याने कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, योगेश पवार, पोलीस नाईक अविनाश भास्कर, विशाल पैठणकर,अनिल काळे, देवराव तायडे, संभाजी आंधळे, महिला अंमलदार सविता वरपे, सिंधू शिकेतोड, पोलीस नाईक सुभाष ठोक, यांच्यासह शेतात छापा टाकला. त्यांच्या समवेत नायब तहसीलदार किरण कुलकर्णी व महसूलचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्रिभुवन यांच्या शेतात गट क्रमांक १७१० मध्ये दोन ते सहा फूट उंचीची. दहा जिवंत व ५८ तोडलेले अशी ६८ गांजा सदृश्य झाडे आढळुन आली. पंचनामा करून पोलिसांनी ही गांजा सदृश्य जाळी जप्त केली आहेत. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.