अकोला दिनांक 30 सप्टेंबर 2022

अकोला जिल्ह्यांमध्ये घोणस अळी मुळे शेतकरीशेतमजूर अळी चावल्यामुळे आजारी पडले आहेत त्यामुळे घोणस अळीने शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे. हे पिकावरील संकट असून यामध्ये मनुष्यावरही संकट ओढवून आलेले आपल्याला दिसत आहे. ही अळी ग्रामीण भागामध्ये घोणस अळी किंवा काटेरी अळी म्हणून ओळखली जात आहे. या काटेरी अळी चा दंश झाल्यास घाबरून न जाता वेळेत औषधोपचार घ्यावा.