होतकरू युवकाची यशोगाथा

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या वरुड देवी येथील राजीव धाबे या युवकांनी पदवी पर्यंत उच्च शिक्षण घेऊन ही नोकरी मिळत नसल्यान व नोकरीच्या मागे न लागता आणि शहराकडे धाव न घेता आपल्या ग्रामीण भागात व गावातच नाव लौकीक व ओळख निर्माण केलीय ..

सहजासहजी कुठलाही व्यवसायाला सुरूवात करायची असल्यास तरूणांचा शहराकडे जास्त प्रमाणावर कल दिसतोय मात्र राजीव धाबेनी या गोष्टीला दुय्यम स्थान देत आपल्या ग्रामीण भागातच लाकडी नैसर्गिक तेलाचा घाणा टाकलाय..

या व्यवसायात त्याला किती नफा मिळेल याच देखील त्याला फारशी कल्पना नव्हती मात्र,घरूनच मोबाईल संपर्क व माध्यमातून ग्राहक जोडल्या जात असून सध्या शुद्ध अनेक प्रकारातील कुठलीही रासायनिक केमिकल विरहित तेलं यांच्या कडून काढून मिळत असल्यान व या नाविन्यपूर्ण उपक्रमात ग्राहकांकडून देखील चांगलाच उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय...

 यामुळ आता आपल्या डोळ्यासमोरच करडई, शेंगदाणा,खोबरा,तीळ, मोहरी,जवस,

पासून ते बदाम तेलाप्रयत्न कुठलंही शुद्ध तेल 

आता येथे मिळू लागलंय तर वैद्यकीय आयुर्वेदात देखील मोठ्या प्रमाणावर डॉक्टर या ठिकाणावरून अनेक लागणाऱ्या तेलांची मागणी करतायंत...

शुद्ध तेल मिळत असल्यान आरोग्य देखील जोपासलं जाणार व भविष्यातील उद्भवणारे आजार देखील दूर होण्यास मदत होईल असी भावना सध्या सर्वांना वाटतेय..