लातूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर च्या वतीने दरवर्षी नवोदित कवी लेखकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व मराठी भाषा सक्षमीकरण हा उद्देश बाळगून कवीसंमेलनाचे आयोजन केले जाते.

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "साहित्यगंध दिपोत्सव २०२२" या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन , "राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कार २०२२", "राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार २०२२ "तसेच "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२" व कवीसंमेलन सोहळा लातूर येथे आयोजित करण्यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष मा.राहुल पाटील, नागपूर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य आयोजक कवी संग्राम कुमठेकर,मा.दिनेश निलंगेकर (संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले प्रा.विद्यालय) , कवी प्रा.कल्याण राऊत, मा.दीपरत्न निलंगेकर (दूरदर्शन प्रतिनिधी) , प्रा.शंकर वाघमारे , मा.बालाजी सगट (ग.शि.अ.), मा.अण्णा नरसिंगे, कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष,लातूर मा.महेश बिराजदार,मा.राम कदम, शिवाजी नामपल्ले यांची आढावा बैठक नुकतीच बोधे नगर येथील बुद्ध गार्डन येथे संपन्न झाली.

गुरूवार दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे "राज्यस्तरीय कवीसंमेलन" भव्य दिव्य करण्यासाठी बैठकीमध्ये अचूक नियोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील व मुख्य आयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कवी/कवयित्री/ पत्रकार/ शिक्षक बंधु भगिनींनी उत्स्फुर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संपादक राहुल पाटील व मुख्य आयोजन समिती ,लातूर यांनी केले आहे.