मोरगाव: नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थाचा फुटबॉल खेळताना मृत्यू झाला आहे. मैदानात खेळत असताना या विद्यार्थाला भोवळ आली. यानंतर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगम खिलेश्वर बोपचे (वय ११) असं मृत मुलाचं नाव आहे. हा विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सोनी येथील रहिवासी होता.

नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील संगम बोपचे हा विद्यार्थी विद्यालयाच्या मैदानावर मित्रांबरोबर फुटबॉल खेळत होता. दरम्यान त्याला भोवळ आल्याने तो मैदानातच पडला. त्याला लगेच विद्यालयाच्या शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगावबांध येथे नेण्यात आलं. तिथे तपासणी करून त्याला साकोली येथील हृदयरोग तज्ज्ञांकडे नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.