चिपळूण : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (FICCI) ज्या कंपन्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि उल्लेखनीय योगदान दिले आहे त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने केमिकल आणि पेट्रोकेमिकल इंडस्ट्री अवॉर्ड्सचे आयोजन केले होते. रासायनिक आणि पेट्रोकेमिकल या गटात घरडा केमिकल्स लिमिटेडची ऊर्जा वापरातील कार्यक्षमता ऊर्जा कमी करणे आणि उत्पादनात उर्जेच्या वापरामध्ये सतत सुधारणा व डिजिटेक फ्रंट रनर ऑफ द इयर उत्पादनात तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटायझेशन, तंत्रज्ञान वापरण्याची लोकांची तयारी आणि कामकाजात सॉफ्टवेअरचा / डिजिटायझेशनचा वापर या दोन विभागांमध्ये कंपनीने पुरस्कार पटकावले

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

भारत सरकारच्या केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण दिल्ली येथे २ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सदर पुरस्कार घरडा केमिकल्स लिमिटेड लोटेचे साईट हेड श्री. रामकृष्ण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली टिमने स्वीकारला. ऊर्जा व तंत्रज्ञान विभागात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल उद्योग जगतातून कंपनीचे अभिनंदन होत आहे. दोन विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याने कंपनीच्या संबंधित विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.