चिपळूण : खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने रत्नागिरी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी ना. सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयासमोर काल सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल ना. अब्दुल सत्तार यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष चित्राताई चव्हाण , जिल्हा महिला उपाध्यक्ष सीमाताई चाळके , जयवंती सावणे , राखी महाडिक , स्नेहा मोहिते , राजेश्री मेटकर , जयश्री निवलकर , गीता साबळे , चांदे मॅडम आदी उपस्थित होत्या.