कापसाच्या शेतात गांजाची झाडे ,46,200 रु मुद्देमाल केला जप्त
हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या धाडसी कारवाईची घेतली अवैद्य धंदे वाले व गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी धास्ती /
वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या हयातनगर येथून जवळच असलेल्या मौजे लिंगी शिवारातील गट नंबर 181 मध्ये वहितीत व कब्जात असलेल्या कापसातील शेतात गांजाची झाडे पकडून हट्टा पोलीस स्टेशनचे सपोनि गजानन बोराटे यांनी पुन्हा एकदा धाडसी कारवाई करून अवैध धंदे करणाऱ्याची कोणत्याच प्रकारची गय करत नसल्याचे परत एकदा या कारवाईतून दाखवून दिले आहे कारण हट्टा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला तेव्हापासून अनेक विविध ठिकाणी यापूर्वी अवैध धंदे करणाऱ्यांवर धाडसी कारवाई करून यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी सपोनि गजानन बोराटे यांची धास्तीच घेतली आहे कारण दिनांक 29 ऑक्टोंबर 2022 रोजी आरोपी केशव शामराव डांगरे वय 30 वर्षे व्यवसाय शेती रा पळशी ता वसमत यांच्या मौजे लिंगी शिवारातील कापसातील शेतात गांजाची झाडे असल्याची गोपनीय माहिती हट्टा पोलीस स्टेशनचे सपोनि गजानन बोराटे साहेब यांना मिळताच त्यांनी दिनांक 29 ऑक्टोंबर 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब ,तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे साहेब, वसमत पोलीस उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे साहेब ,यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे साहेब ,यांनी साफळा रचून मौजे लिंगी शिवारातील शेतात आरोपी केशव शामराव डांगरे राहणार पळशी,यांच्या कापसाच्या शेतात धाड टाकून तब्बल यामध्ये 7 झाडे, 7 किलो 700 ग्राम, वजनाची किंमत 46200 रुपये असलेला मुद्देमाल गांजाची झाडे पकडून धाडसी कारवाई केली या धाडसी कारवाईमध्ये सपोनि गज