बीड प्रतिनिधी/ दि.08 मोची पिंपळगांव गौण खनिज उत्पन्न अनेक वर्षापासून बेमाफ बेहिशोबी चालू आहे. या उत्शाने मोची पिंपळगाव ते जरूड, भवानवाडी फाटा रस्त्याचे काम वर्षांनी वर्ष आडवले आहे. तो रस्ता ही नामशेष केला असून तो मार्ग कायमस्वरूपी बंद होत आहे. तसेच ही गौण खनिज गांवालगत 1. फिलोमीटरच्या आत आहे. गांव व गावाच्या आसपास 12 किलोमीटर दुषित हवा मुळे प्राणी पशु. जमीन पाणी जन जीवनावर परीणाम होत आहे. तसेच गौणखनिज उत्खन्न नियोजनकर्ते प्रबंधक यांनी अहमदनगर परळी थे. मंजूरोच्या प्रक्रियेत ही जमीन खरेदी केली आहे व त्यात प्राकृतीक व मोजमापनाच्या बाहेर असणारी नदी जोडली असून त्यावर वारेमाप उत्खन्न व आर्थिक नफा मिळवला जात आहे. अहमदनगर-परळी थे. रेल्वेमार्गाकरिता सध्या खडी वाळू मटेरीलय येथून पुरवले जात आहे. किती बास रेल्वे कामात दिल्या गेल्या व प्रती दिन किती खोदकाम केले मोबदल्यात देशाच्या शासनाला किती लुटले. याचा ताळमेळ नाही येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालु आहे.

या प्रकरणी दिनांक 28/02/2022 ला पूर्व सैनिक प्रकाश वाघमारे यांनी आंदोलन केले असता उपोषणार्थीचे आंदोलन बंद करण्याचे नियोजन उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकाशी नामदेव टिळेकर व डॉ. गणेश ढवळे समाजसेवक इत्यादीने केले व चौकशी 8 दिवसात करून माहिती देवू असे आश्वासन दिले. तेव्हा पासून तीनही मध्यस्थी याचे उत्तर देत नाहीत व चौकशी पण करत नाहीत. ज्या मुळे मोची पिंपळगांव उत्खन्नाचा वेग भयानक वाढला आहे. प्रस्थापित राजकारणी भांडवलदार असल्याने त्यांच्या विरुध्द ढवळे चौकशी किंवा अन्य अदिलन करत नाहीत. मात्र मध्यम व सुरक्षीत गौण उत्खन्न करणारे उद्योजक यांच्या विरुद्ध लिंबागणेशकर आंदोलन करताना दिसतात. मोची पिंपळगांव गौण उत्खन्नात केलेल्या मध्यस्थीची जाणीव यांना का होत नाही. या आश्वासनाचे विसर्जन यांना झाले आहे. असे समाज कारण योग्य आहे, का दुसन्याचे आंदोजन बंद करून स्वतःहाचे आंदोलन दिशाहीन चालवणे हा वेगळा परिणाम दर्शविण्याचा भाग आहे. दुसन्याच्या आंदोलनात ढवळा ढवळ करून नावलोकित करणे बंद करा, जिल्हाधिकारी यांना हटवण्याची मागणी आपण केल्याचे दैनिकात वाचले परंतू आपण जे कृत्य करत आहात याचा बोध घेवून आपण लाक्षणिक उपोषणास हजेरी लावून आजपर्यंत काय साध्य केले.फक्त दैनिकांत नाव येणे इथ पर्यंतचा आपला प्रवास वाटतो यापुढे उपस्थित प्रकरणावर काय आवाज उठवता याची प्रतिक्षा करतो.