कै धुंडिराज शास्त्री महाराजांच्या आठवणींना उजाळा

बीड/प्रतिनिधी

श्री संत जनीजनार्दन स्वामी यांच्या 422 व्या वार्षिक उत्सवानिमित्त थोरल्या पाटांगणवर बीड शहरातील स्थानिक कलावंतांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती,यामध्ये अनेक कलाकारांनी आपली संगीत सेवा सादर करून स्व धुंडिराज शास्त्री महारांजाच्या आठवणींना उजाळा दिला

प्रति वर्षाप्रमाणे संत जनीजनार्धन स्वामी यांच्या 422 व्या वार्षिक उत्सवा निमित्त बीड शहरातील स्थानिक कलावंतांची संगीत मैफिल आयोजित करण्यात येत असते,गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा असून सोमवारी सांयकाळी 6 वाजता ज्येष्ठ गायक भरत आण्णा लोळगे, सुधीर देशमुख, अमर डागा, सौ सुनंदाताई देशमुख, वासवदत्ता हसेगावकर,सचिन मार्गे,जनार्धन कदम,प्रा काळे,स्वयंप्रकाश खडके,मजहर अली, सिद्धांत पाटांगणकर,राधेश्याम चिरके,वैद्य मॅडम,निलिमाताई वझे,यांनी आपले गायन सादर केले,त्यांना तबला साथ संगत प्रकाश मानूरकर योगीराज वाघमारे,के सी चव्हाण,बालाजी मानगिरे,चंद्रकांत शेळके(पखवाज)प्रमोद वझे(टाळ) तर हार्मोनियम साथ सुदर्शन धुतेकर यांनी दिली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रशांत सुलाखे यांनी केले,यावेळी मंत्रमूर्ती पाटांगणकर याने स्व धुंडिराज महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला,प्रत्येक वर्षी महाराज संगीत मैफिलीसाठी आग्रही असायचे,राज्यातील अनेक नामवंत कलाकारांनी याठिकाणी हजेरी लावून आपली सेवा सादर केलेली आहे,उत्सव सुरू झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी देखील महाआरती प्रसंगी उपस्थित राहतात,महाराजांनी स्थानिक कलाकारांना जाणीवपूर्वक हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे,या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात,समाप्ती दिवशी महाप्रसाद ही परंपरा देखील जोपासली जाते,आजच्या कार्यक्रमास डॉ वासुदेव निलंगेकर, मन्मथ अप्पा हेरकर,जेष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी, लक्ष्मीकांत खडकीकर,देवा कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी, प्रवीण इंगळे,नंदकुमार गुळजकर,आदि उपस्थित होते,शेवटी दि 10 रोजी सर्व भाविकांनी महाप्रसाद साठी उपस्थित राहावे असे आवाहन ह भ प विनय महाराज पाटांगणकर यांनी केले आहे