सध्या शासनाकडून ई-पीक पाहणी उपक्रम सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात काय पीक घेतले हे ॲपच्या माध्यमातून स्वत: पिकाची नोंद करता येणार आहे. जिल्ह्यात सुमारे तीन लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. साखर कारखाना प्रशासनाने उसाचे क्षेत्र ऑनलाईन होईल, यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. ई-पीक पाहणीचे नवीन ॲप व्हर्जन आले आहे. यामुळे स्वत:च्या शेतात, पिकात जावून फोटो काढून अपलोड करता येतो. यामध्ये गट कोणता हेही ॲपवर समजणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.
साखर कारखान्यांच्या कृषी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्कात राहून ई-पीक पाहणी करण्यासाठी पुढे यावे. कृषी अधिकारी, चीटबॉय यांच्यामार्फत शेतकऱ्यांना जागृत करावे. याबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.
डॉ. सोनवणे यांनी जिल्ह्यातील लम्पी आजाराबाबत माहिती दिली. श्री. साठे यांनी साखर कारखान्यांना विविध सूचना केल्या.