औरंगाबाद पैठण येथील पत्रकाराला वाळू माफियांनी दिलेल्या धमकीच्या विरोधात महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे पोलीस अधीक्षकाला निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे  पैठण येथे ६ नोव्हेंबर रोजी रात्री पैठण तहसील च्या महसूली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध कार्यवाही करून त्यांचे एक वाहन जप्त केले होते . याची माहिती स्थानिक पत्रकार मुफिदर पठाण यांना मिळताच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व केलेल्या कार्यवाहीचे, व वाहनाच्या छायाचित्रण करून ही माहिती प्रेस पोलीस क्राईम या ग्रुप वरती टाकली ही माहिती का टाकली म्हणून वाळू माफियांनी पैठण येथील एका दैनिकाचे प्रतिनिधी मुफीदर पठाण यांच्या घरी जाऊन त्यांना त्यांच्या कुटुंबा समोर अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली पत्रकाराने त्याची केलेली कारवाई ही त्याच्या पत्रकारितेचा एक भाग असून त्यांनी त्याचे कर्तव्य बजावले असता त्यांना अशा प्रकारे धमकी देणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आव्हान देण्यासारखे आहे . महाराष्ट्र शासनाने ८ नोव्हेबर २०१९ रोजी काढलेल्या आदेशान्वये पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणला असून या कायद्याचे अंतर्गत अशा मुजोर वाळू माफियांवर कडक कारवाई करून त्यांना चबर वचन बसावा व योग्य ते शासन करण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाच्या माध्यमातून ग्रामिण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलेले आहे . या निवेदनावरती महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संस्थापक संघाचे अध्यक्ष दादासाहेब काळे, सचिव प्रकाश सातपुते , राष्ट्रीय प्रवक्ता सुधीर खैरे ,श्री रमेश नेटके, इमरान पठाण, राधेश्याम हिवाळे, रवींद्र खरात ,शिवाजी नवले ,अमोल कोलते, इत्यादी प्रतिनिधीने स्वाक्षरी करून सदर निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय अधिक्षक श्रीमती जामवंत मॅडम यांना देऊन त्वरित कारवाई करण्याचे विनंती केलेली . सदर निवेदन ग्रामिण पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्या समोर ठेवून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले