पुणे: चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून वाहतूक विभागात हस्तांतरण केलेल्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

अधिक माहितीनुसार, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्यांना वाहतूक शाखेकडे हस्तांतरित केले होते. एका घड्याळ चोरीच्या प्रकरणात अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अटक न करण्यासाठी या पोलिसांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली.

या माहितीची पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रविवारी चतु:श्रृंगी वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आला. त्यात दोघा पोलिसांना लाच घेताना पकडले. त्यावेळी आणखी दोघेजण तेथे होते. त्यामुळे या लाच प्रकरणात त्यांचा संबंध आहे का, याची पडताळणी रात्री उशिरापर्यंत करण्यात येत होती.