बीड (प्रतिनिधी) आज बीड येथे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा मुलगा संदीप राजपुरे यांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर आई-वडिलांची परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी आपले यश प्राप्त करण्यासाठी अहोरात्र मेहनत करून इंडियन आर्मी या पदावर जाण्याचे स्वप्न साकार केले त्याच्या या यशाबद्दल आज बीड येथे संदीप राजपुरे यांना सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम प्रकाश भैय्या सोनसळे समाजसेवक यांनी आयोजित केला होता. संदीप बाबासाहेब राजपुरे हा महेंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड संदिप राजपुरे यांचे माध्यमिक विद्यालय पिंपळगाव येथे झाले.
संदीप राजपुरे यांचा सन्मान करताना प्रकाश भैय्या सोनसळे समाजसेवक,हनुमंतराव काळे ,महादेव हजारे , नारायण धापसे ,डॉ.संतोष महानवर, भरत गाडे, शितलताई मतकर, सूर्यकांत कोकाटे प्राध्यापक ,ज्ञानेश्वर गाडेकर शिक्षक,गोरक्षनाथ ढोरमारे , गणेश गाडे , हनुमान गाडे,बंडू खंडागळे, मल्हार महानवर, आदी उपस्थित होते.