पाटोदा (प्रतिनिधी) सामाज कल्याण विभागाची अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलीची शासकिय निवासी शाळा, पाटोदा जि.बीड या शाळेतील मुलींनी आपल्या कलेतून राज्यस्तररावर आयोजित केलेल्या भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि पुढे त्याच संघाची राष्ट्रीय पातळीवर आयोजित स्पर्धेमध्ये सुध्दा निवड करण्यात आली आहे. शाळेतील सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून सर्व विद्यार्थिनींनी सुंदर आणि आकर्षक रित्या सादरीकरण केले व भूमिका अभिनय आणि लोकनृत्य या दोन्ही स्पर्धेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकिय निवासी शाळा या संघाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवर बीड जिल्ह्याचे नाव झळकावण्याची संधी निर्माण झाली आहे. दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे येथे आयोजित राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2022--23 अन्वये राज्य पातळीच्या स्पर्धामध्ये बीड जिल्हा प्रथम क्रमांक ने सन्मानित करण्यात आला.या प्रसंगी उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे सर्व विद्यार्थिनीचे विशेष कौतुक विविध स्तरांतून करण्यात आले. तर यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मुलींना मार्गदर्शन केले त्यांचे पण विशेष अभिनंदन करण्यात आले. आहे.प्रकल्प 2022 -23 अन्वये राज्यस्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य दोन्ही स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबददल समाजकल्याण विभाग बीड चे सहायक आयुक्त रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक तांबे एस.बी. यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले व शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती.चव्हाण बी.एस,श्रीमती.तांदळे बी.एम , तरकसे एन.एस , श्रीमती.जोगी आर.आर ,दराडे डी.पी , गायके वाय.बी.जावळे टी.ए , ढोले ए.ए. यांनी उत्कृष्ट रित्या जबाबदारी पार पाडली याबद्दल आयुक्त प्रशांतजी नारनवरे समाजकल्याण महाराष्ट्र राज्य पुणे, मा. शिक्षण सह-संचालीका श्रीमती.बंडगर मॅडम, मा. प्रादेशिक उपायुक्त जलील शेख साहेब समाजकल्याण औरंगाबाद विभाग, तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण बीड या कार्यालयातील सर्व अधिकारी - कर्मचारी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई, जि.बीड चे मा.प्राचार्य जयपाल कांबळे साहेब, सामाजिक शास्त्र व कला विभागप्रमुख दिलीप जमादार यांनी शाळेतील विद्यार्थिनींचे व सर्व कर्मचारी यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करून संघाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं