रत्नागिरी : कोकण रेल्वेचा प्रकल्प ठरलेल्या वेळेमध्ये पुर्ण केला तेव्हा आम्ही कोकण रेल्वेच्या आधिकाऱ्यांचा सत्कारही केला होता.चांगल्या कामाला शाब्बासकी देणे हे आमच्या कोकणी लोकांचे वैशिष्टये आहे.प्रवाशी व प्रकल्पाग्रस्त यांच्या मागणीकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.सुपरफास्ट गाडयांचे थांबे,चिपळुण दादर पॅशेनजर गाडी सुरु करणे लोकल गाडयांना जादा डब्बे जोडणे चिपळुण जंगशन रेल्वे स्टेशनवर आरक्षणाचा कोटा वाढवून मिळणे असे काही महत्तावाच्या प्रश्नाकडे कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या मागणीकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष केले आहे.त्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.चिपळुणच्या जंगशन रेल्वेस्टेशनवर गाडी मध्ये पाणी भरण्यासाठी सर्व गाडया थांबतात मग सुपरफास्ट गाडयांना थांबे देण्यासाठी अडचण काय?

कोकण रेल्वे तोटयामध्ये आहे असे रेल्वे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.कोकण रेल्वे तोटयात असेल तर तोटयातुन बाहेर काडण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढली पाहिजे व त्यांच्या सोई सुविधेकडे रेल्वेनी लक्ष दिले पाहिजे.कोकण रेल्वेचा तोटा प्रवाशांच्या माध्यमातुनच सुटु शकतो.म्हणुन त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले पाहिजे.तोटा भरुन काडण्यासाठी प्रवाशांच्या सहकार्याने आम्हीही प्रयत्नशील राहु.परप्रांतिय वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचा कोकण रेल्वे खाजगीकरणांचा डाव आम्ही हाणुन पाडु.असे प्रतिपादन कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केले आहे व ते पुढे म्हणाले की,कोकण आमचे, कोकण रेल्वे ही आमची,हुशारी कशाला तुमची!असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना संतापुन कळविले आहे.