महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांच्या वतीने काम बंद आंदोलन..

गटविकास अधिकारी पंचायत समिति पैठण यांना देण्यात आले निवेदन...

सरकारच्या विविध योजनांकरिता काम केले मात्र अद्याप पर्यंत मोबदला मिळाला नाही ‌तरी मोबदला मिळावा हि प्रमुख मागणी....

बिडकिन प्रतिनिधी:-

आज दि‌ ०४ रोजी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांच्या वतीने काम आंदोलन संदर्भात गटविकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती पैठण यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदनात असे म्हटले आहे की,आम्ही सर्व संगणक परिचालक आज पासुन काम बंद पुकारत आहोत. कारण महोदय आम्ही 2020 मध्ये मिशन अंत्योदय आणि ई.ओ.एल. हा सर्व्हे केला त्यावेळी आम्हास असे अश्वसित केले होते की, तुम्ही हे दोन कामे पुर्ण करा बजेट आलेले आहे. तो निधी आतापर्यंत आमच्या खात्यावर वितरीत केला नाही, आम्ही वेळोवेळी याचा पाठपुरावा केला तितक्या वेळेस आम्हास संगितले गेले कि, तुमचा निधी वर्ग करुन दिला जाईल तो काही आतापर्यंत आम्हास मिळाला नाही. त्यानंतर थोडेसे मायबाप, ओ.डी.एफ. व तुमच्या आदेशाने कोविड लसिकरणाचे काम देखिल केले परंतु अद्याप आम्हा संगणक परीचालकांना या कामाचा मोबदला मिळाला नाहि. म्हनुणच आम्ही सर्व संगणक परीचालक व संघटनेच्या वतीने काम बंद करण्याचे ठरवले. आम्हास वेळोवेळी फक्त अश्वासनेच मिळत आहे.मध्यांतरी तुम्ही आरोग्य विभागास बोलले आमच्या बाबतीत मध्ये मानधनासाठी त्याबद्दल बरे वाटले परंतु तुम्हाला त्यांनी सांगितल्या प्रमाणे सप्टेंबर मध्ये मानधन वर्ग करतो म्हणुन संगितले ते अद्यापर्यंत वर्ग केले नाही. तसेच तुम्ही ग्रामसेवक यांच्या मिटिंग मध्ये त्यांना थोडेसे मायबाप योजनेचे मानधन द्या असे तोंडी आदेश दिले त्याबद्दल देखिल आम्ही व आमची संघटना आपले आभार माणतो परंतु ग्रामसेवक यांनी सुध्दा असे संगितले कि आम्हाला तोंडी स्वरुपाचे आदेश दिले लेखी आदेश दिले मग तुम्हाला मानधन वर्ग करू ते देखील असे सांगत आहे.या सर्व गोष्टी विचारात घेता संघटनेने असा निर्णय घेतला की, पुर्ण तालुक्याने काम बंद आंदोलन पुकारायचे म्हणून जोपर्यंत आम्ही केलेल्या कामाचा मोबदला मिळणार नाही तो पर्यंत कुठलेही काम करायचे नाही असे आवाहन व मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदरिल निवेदनावर पैठण तालुका अध्यक्ष संदिप हुड,सचिव तालुका रामेश्वर थोरे,उपाध्यक्ष तालुका योगेश इंदापुरे यांच्या सहीनीशी हे निवेदन देण्यात आले आहे.यांच्यासमवेत पैठण व परिसरातील संगणक परिचालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारल्याने जनसामान्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो.तरी संगणक परिचालक संघटना यांच्या सर्व मागण्या तातडीने पुर्ण करण्यात याव्यात अशी मागणी संगणक परिचारिकांच्या वतीने केली जात आहे...

रविंद्र गायकवाड, बिडकिन