पुणे: शेजारी राहणाऱ्या मायलेकींने शिव्या दिल्याने अपमान जिव्हारी बेतल्याने पुण्यात ११ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुद्राक्ष लुकेश जाधव (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तर यासंदर्भात आशा लुकेशा जाधव (वय ३२, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, घरी आलेल्या मुलाला वारंवार शिवीगाळ केल्याने एका ११ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. फिर्यादी आणि आरोपी या एकाच भागात राहतात. फिर्यादी यांचा मुलगा हा सहावीत शिकत होता. तो आरोपींच्या घरी गेला असताना विद्या व तिची आई साधना कांबळे यांनी रुद्राक्ष याला शिवीगाळ केली. त्या रागातून रुद्राक्ष याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

तर रुद्राक्षच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल विद्या व साधना कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.