आता सध्या च्या वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आदी आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही आजार अथवा ताप अंगावर न काढता ग्रामीण रुग्णालय धर्माबाद कींवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वेणुगोपाल पंडित यांनी केले आहे. धर्माबाद तालुक्यात मागील आठवड्यापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. परतीच्या पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. सध्या धर्माबाद शहर ग्रामीण भागात सर्दी, खोकला, आणि तापाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. धर्माबाद शहरातील खाजगी रुग्णालयातही तापाचे रुग्ण मोठ्या संस्थेने उपचारासाठी दाखल होत आहेत. ज्या रुग्णांना ताप खोकला दमा येत असल्याने‌ ग्रामीण रुग्णालय येथे येऊन रक्त तपासणी करून घ्यावी व सर्व प्रकारच्या रक्त तपासणी मोफत आहेत. आरोग्य विभागाकडून अनेक प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.सध्या बालकांना व ज्येष्ठ नागरिकांना तापीने पछाडले आहे. त्यात च दरम्यान त्रास असणाऱ्या रुग्णांना वातावरण बदलण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. दिवसेंदिवस बदलणाऱ्या सततच्या वातावरणामुळे कुटुंबप्रमुखांनी आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. बाहेरचे खाद्यपदार्थ लहान मुलांना देऊ नयेत अशी आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे ....

 *नागरिकांनी आरोग्यची काळजी घ्यावी !* 

दीपावली पाडव्यानंतर वातावरण सायंकाळच्या वेळी बदल दिसून येत असून नागरिकांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी घराच्या बाहेर पडतेवेळी स्वेटर आणि मपलरचा वापर करावा तसेच घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळावे घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी ताप खोकला येत असेल तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊनच औषध घ्यावा.. *डॉ.अरविंद फिसके (वैद्यकीय अधिकारी)* 

 *ॲलर्जी पासून संरक्षण व्यायाम !* 

 लहान मुलांना ॲलर्जीचे आजार दमट वातावरणामुळे बाळातात त्यासाठी लहान मुलांना धुळीपासून दूर ठेवावे संसर्गजन्य आजार होणार नाहीत याची काळजी घेऊन गरम आणि उबदार कपडे घालावेत ताप सर्दी सारखे आजार झाल्यास बालरोग तज्ञाकडून उपचार करून घ्यावेत मनाने औषध उपचार घेऊ नयेत हिवाळ्यात लहान मुलांना प्रकृती सांभाळताना सोबतच व्यायामाची सवय लावावी यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत... *डॉ संजय पोहरे (वैद्यकीय अधिकारी)*