रत्नागिरी : तालुक्यातील पावस एज्युकेशन सोसायटी कला -कौशल्य केंद्र यांचे सहकार्याने फिनोलेक्स, मुकुल -माधव फौंडेशन यांच्या सौजन्याने युवा परिवतन कोर्स इलेक्ट्रिशियन, मल्टीस्किल (प्लंबिंग , इलेक्टीशियन , पेटिंग ) असे तीन महिन्याचे सर्टिफिकेट कोर्सचे उदघाटन करताना जावेद काझी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात लाईक फोंडू यांनी फिनोलेक्स कंपनीला धन्यवाद देऊन मुकुल-माधव फौंडेशन युवा परिवतन कोर्समुळे पावस परिसरातील तरुणांना काम मिळेल असे समाधान व्यक्त केले.

कंपनीने आजपर्यंत परिसरातील युवांचा प्रामुख्याने विचार करून त्यांना रोजगाराची संधी देत आहे. कंपनीने यापुढे तरुणांना हाती काम द्यावे ही प्रामुख्याने आमची मागणी असेल असे प्रतिपादन केले.

यावेळी उपस्थित श्री मन्सुर काझी, शशफी काझी, अक्रम नाखवा, एल-सी.डी.मॅनेजर वनिश्का मुरकर, वायरमन ट्रेनर शौकत मजगांवकर, मल्टीस्किल ट्रेनर भिकाजी नाटेकर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत लाईक फोंडू यांनी केले.