रत्नागिरी : मुसळधार पावसात वीजपुरवठा खंडीत झाल्याचा मनात राग धरून महावितरणच्या पाली कार्यालयातील तत्कालिन सहाय्यक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी सबळ पुराव्याअभावी तरुणाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
२०१९ मध्ये रत्नागिरीत धुवाँधार पाऊस कोसळला होता. ४ जुलै २०१९ रोजी पहाटेपासून ठिकठिकाणी इलेक्ट्रीक पोल व लाईनवर झाडे कोसळून वीजपुरवठा खंडीत झाला होता. पाली सेक्शनमधील करंजारी फिडरची मेनलाईन तुटली होती. त्याचवेळी नाणीज नवीन मठाचेसमोर रस्त्याकडेला इलेक्ट्रीक पोलवर झाड पडले होते. तसेच मठाच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरमध्येदेखील बिघाड झाला होता. आजूबाजूच्या अनेक घरांचा वीजपुरवठा त्यामुळे खंडीत झाला होता. करंजारी येथील ११ के. व्ही. लाईनदेखील बंद पडल्यामुळे १० गावांचा विद्युतपुरवठा बंद झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. ५ ऑगस्ट रोजी सहाय्यक अभियंता धनाजी कृष्णराव कळेकर (वय ३६) हे पाली येथील आपल्या कार्यालयात बसले असताना त्यांच्या मोबाईलवरती फोन आला व दळी नामक तरुणाने कळेकर यांना लाईट कधी येणार अशी विचारणा करून 'तू तिथे काय काम करतोयस?” अशी विचारणा केली.
यावेळी करंजारी लाईन सुरू झाल्यानंतर तुमची लाईन आम्ही सुरू करून देतो, असे कळेकर यांनी संागितले. मात्र संतप्त झालेल्या सिद्धेश दळी यांनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. नाणिज येथील लाईट कधी येणार? अशी विचारणा करून तुम्ही आत्ताच्या आत्ता माझी लाईट सुरू करून द्या, अशी भूमिका सिद्धेश याने घेतली. सहाय्यक अधिक्षक धनाजी कळेकर व इतर अधिकारी त्याची समजूत काढत असताना सिद्धेश याने कळेकर यांचे शर्ट पकडून त्यांना मारहाण केली. 'तू एकटा मला सापड, तुला तुडवतो' अशी धमकीही दिली होती..
याप्रकरणी धनाजी कळेकर यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं.वि.क. ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने सिद्धेश दळी याची सबळ पुरावअभावी निर्दोष मुक्तता केली. त्याच्यावतीने ऍड. मुन्ना शिंदे, ऍड. राहुल चाचे, ऍड. गिरीश भिडे, ऍड. प्रविण कदम यांनी न्यायालयात बाजू मांडली.