पाऊस पडला की जसे बेडक बाहेर पडतात आणि डराव डराव करतात तसे अडीच वर्षांनी राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यावर राजकीय इच्छया आकांक्षा बाळगुन असलेले सत्तापिपासू लोक दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणत आम्ही केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी आता बाहेर पडले असल्याची खरमरीत टीका आमदार अनिकेत तटकरे यांनी मौजे मेंदडी कोळीवाडा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप मतदार संघ प्रमुख कृष्णा कोबनाक यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना केली आहे.
आम्हाला जनतेने निवडून दिलेल्या संविधानाचा वापर करूनच मंजुर केलेल्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करतो असेही ठणकावून सांगितले.गेली अडीच वर्षे मतदार संघातुन गायब झालेले विरोधी पक्षांचे पदाधिकारी आमदार आदिती तटकरे पालकमंत्री असताना आम्हाला काम द्या असे फोन करून सांगत होते आणि आता मतदार संघात तुम्ही काय काम केलात असा उलट प्रश्न विचारतात यावरून त्यांची किव येते.आम्ही या मतदार संघाचे लोकप्रतीनिधी आहोत आणि तो आमचा अधिकार आहे आमच्या अधिकारात या पुढे अशा प्रकारे कोणी ढवळाढवळ करू नये,जर कोण असे करीत असेल तर त्यांना वेळीच जाब विचारण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पुढे सरसावले पाहिजे अशा सूचना आमदार अनिकेत तटकरे यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमात केली आहे.शिवसेना मेंदडी विभाग प्रमुख रमेश डोलकर आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसैनिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. आयोजीत स्वागत सोहळ्यात आमदार अनिकेत तटकरे यांनी पक्षप्रवेशकर्त्या कोळी बांधवांचे सामाजिक सभामंडप बांधकामासाठी त्यांचे आमदार फंडातून ७.५ लक्ष रुपये मंजुरीचे प्रशासकीय मान्यता पत्र सुपुर्द केले.कार्यक्रमाला जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती छाया म्हात्रे,माजी उपसभापती संदिप चाचले, मधुकर गायकर,जमीर नजीर,लहू म्हात्रे,महीला अध्यक्षा सोनल घोले,युवती प्रमुख वृषाली घोसाळकर,गण अध्यक्ष जहूर काझी,समाज अध्यक्ष अनिल बसवत,रमेश काणसे,मोरेश्वर पाटील,गाव प्रमुख चीपोलकर आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार अनिकेत तटकरे यांनी पक्ष प्रवेश कर्त्या कोळी बांधवांना संबोधीत करताना या गावात अनेक वर्षे सामाजिक, राजकिय वादाने एकमेकांची मने दुभंगली आणि वाद विकोपाला गेला होता आता गावाची एकता,सुबत्ता,विकास आणि स्वास्थ टिकवुन ठेवायचे असेल तर आपापसात वादविवाद,हेवेदावे विसरून गेले पाहिजे.झाले गेले गंगेला मिळाले असे समजुन स्वास्थ टिकवुन विकास साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे कोळी बांधवांना सांगताना भारत देश स्वातंत्र झाल्याला ७५ वर्षे पुर्ण झाली.संविधानाचे जोरावर आपल्या देशात अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येतो आहे असे असताना आपल्या बाजूंच्या पुर्व पश्चिमेला असलेल्या पाकिस्तान,बांगलादेश,श्रीलंका सारख्या देशात अराजाकता निर्माण झाली आहे.वाद विवादाने,आतंकवाद जोपासत असलेल्या पाकिस्तान देश कसा देशोधडीला लागला आहे हे जिवंत उदाहरण असल्याचे आमदार तटकरे यांनी सांगितले.
सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मेंदडी विभगातून दोन महीला प्रतिनिधि निवडून आल्या.खासदार सुनिल तटकरे यांनी केलेल्या विकास कामांचे जोरावर हे साध्य करता आले. प्रत्येक वाडी वस्तीत तीन ते चार कोटी रुपयांचे विकास कामे पुर्ण करण्यात आली आहेत असे असले तरी मेंदडी गाव अंतर्गत रस्ता डांबरीकरण आणि पाणी पुरवठा योजनेचे कामाला गती देण्यासाठी प्रयत्नशील राहुन काही दिवसांत ते काम पूर्ती करू असे आश्वासन देताना मेंदडी कोळीवाड्यातील समाजमंदीर आपापसातील वादविवादाने दोन वेळा बंद करण्यात आले होते आता एका पक्षाचे छत्रात आल्याने यापुढे चंद्रसुर्य असे पर्यंत विचारांची बैठक असणारे सामाजिक सभागृह बंद करण्याची वेळ ग्रामस्थांवर येवू नये तसेच कोर्ट केसेस आणि पोलिस ठाणेतील तक्रारीपासुन लांब राहण्याचा सल्ला आमदार अनिकेत तटकरे यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवा जुना असा कोणताही भेदभाव नाही सर्वांना सारखा मानपान आसेल असे स्पष्ट करताना गावात वादविवाद हेवेदावे करून राजकिय पोळी भाजनारे घटना घडल्या नंतर चार हात लांब असतात त्यांचे पासुन सावध रहावे असे सुचित केले.गावाचा विकास तटकरे परिवारच करू शकतो हा दृढ विश्वास झाल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असल्याचे शिवसेनेचे विभाग प्रमुख रमेश डोलकर यांनी सांगितले.आयोजीत कार्यक्रमांत जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर, लहू म्हात्रे,अनिल बसवत यांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा देत कोळी बांधवांची सामाजिक,राजकीय एकता झाल्याचे समाधान व्यक्त केले.