लांजा : भ्रष्टाचाराला आळा बसावा भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असावे, यासाठी लाच-लुचपत विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. लाच देणारा आणि घेणारा असे दोघेही दोषी असून लाज देणे अथवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, यासाठीच लाच लुचपत विभागाकडून ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.

          

दि 03 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 11 वाजता ग्रामपंचायत खानवली येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी दक्षता सेवा सप्ताह उपक्रमाचे औचित्य साधून भ्रष्टाचाराला प्रतिबंधक करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिरात सुशांत चव्हाण पोलीस उपाधीक्षक हे स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

         

या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक प्रथमेश बोडेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.