रत्नागिरी : नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी शहराजवळील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले ओबीसी सरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा ओबीसी संघर्ष समिती तालुका रत्नागिरीच्या वतीने कुणबी भवन जेके फाईल येथे संपन्न झाला.यावेळी चरवेली, पोमेंडी बुद्रुक, शिरगाव व फणसोप ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

         

या कार्यक्रमाला रायगडवरून आलेले रोशन पाटील सर यांनी सर्व ओबीसी बांधवांना संबोधित करताना ओबीसींच्या जातीनिहाय जनगणना, राजकीय आरक्षण व ओबीसींचे हक्क आणि अधिकार यावर भाष्य करताना ओबीसी चळवळ वाढली पाहिजे आज आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी म्हणून स्थान मिळाले आहे ते केवळ ओबिसींच्या न्याय हक्कासाठी सातत्याने झटत असणा-या ओबिसींच्या संघटना मुळेच हे शक्य होत आहे अन्यथा आपण सर्वजण दुर्लक्षित घटक म्हणून समाजव्यवस्थेत कुणाचे तरी वेठबिगारी म्हणून काम करत असतो तेव्हा आपण ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना ओबीसींच्या हक्क अधिकारासाठी झटले पाहिजे असे सांगून सर्वांनी वज्रमूठ करून न्याय हक्कासाठी एकत्र आले पाहिजे .अशोक भाटकर साहेब यांनी ओबीसी कोण आहेत याची जाणीव उपस्थितांना करून देताना जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सरकार वारंवार फसवत असून 2021 साली होणारी जनगणना झाली नाही त्यामुळे ती आता 2031 साली होणार तोपर्यंत ओबीसींना अनेक लाभापासून वंचित रहावे लागणार आहे.बाळकृष्ण झोरेसर यांनी आरक्षणाबाबत ओबिसींची कशी फसवणूक केली जाते याचा दाखला देत ओबीसींनी याबाबत जाब विचारण्याची गरज असल्याचे नमूद केले. यानंतर ओबीसी संघर्ष समन्वय समिती राज्यस्तरीय पदाधिकारी कुमार जी शेट्ये साहेब राजेंद्र आयरेसर, जिल्हा उपाध्यक्ष बाबा उर्फ प्रकाश साळवी साहेब, संघर्ष समिती उपाध्यक्ष राजिव किरसाहेब, तालुका महिला अध्यक्ष साक्षीताई रावणंग, जिल्हा सदस्या स्नेहा ताई चव्हाण व ओबीसी संघर्ष समिती तालुका रत्नागिरीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते साहेब यांनी ओबीसींना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघर्ष समितीचे सचिव सुधीर वासावे तर प्रास्ताविक रघुवीर शेलार सर यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन युवा अध्यक्ष कौस्तुभ नागवेकर यांनी केले.या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य ओबीसी बंधूभगिनींनी उपस्थिती दर्शविली.या सोहळ्यात चरवेली विभागातून निवडून आलेले सरपंच सौ.स्नेहा नागले, शैलेश नागले,ऋतीका नागले ,साक्षी नागले, सुरेश सावंत तर पोमेंडी बुद्रुकमधून निवडून आलेले सरपंच सौ.ममता जोशी, रमेश घाणेकर,सायली बाणे, राजेंद्र कळबटे,विजया कांबळे, विशाल भारती तसेच शिरगाव मधून निवडून आलेले सचिन सनगरे, कांचन गोताड,निरजा शेट्ये,मयुर सांडिम,अंकिता सनगरे,मितीला शिंदे, मिलींद बाणे, जान्हवी कदम,स्नेहा भरणकर तर फणसोप येथील सदस्य रेणूका आंग्रे व साक्षी चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.