सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...

"पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील घटना"

पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकांने मंगळवारी (दि.१)रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून योगेश लक्ष्मण वाघ असे त्या आत्महत्या केलेल्या युवकांचे नाव असुन त्यानी आत्महत्या का केली ? हे अद्यापही समजू शकले नाही.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, योगेश हा गेल्या दोन वर्षापासून सैन्य दलाची तयारी करत होता. त्यामूळे तो दररोज पाहटेच्या दरम्यान आपल्या शेताकडे जाऊन तयारी करत असे आज सकाळी तो गेला होता,मात्र आठ वाजले तरीही तो घरी परतला नाही,यामूळे घरातील नातेवाईकांने शेतात कडे गेले असता त्यांना योगेशनी घरुन सोबत नेहलेली दुचाकी शेतात लावलेली दिसले.परंतु तो तिथ दिसला नसल्यामुळे नातेवाईकांना संशय झाला आणि त्यांनी शेजारच्या विहिरीकडे जाऊन पाहीले असता विरीहिमध्ये योगेशची चप्पल तरंगत असल्याचे दिसले,त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ गावकरी नागरिकांना दिली असता गावकऱ्यांनी त्या विहीरित लोंखाडी गळ सोडून त्याचा विहीरीत शोध घेतला. यावेळी योगेशने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.या घटनेची माहीती तात्काळ पाचोड पोलिस ठाण्यांत कळविले असता बीट जमादार आन्नासाहेब गव्हाणे यांना कळविण्यात आले असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत