युथ ऑफ टुडे चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष मार्शल नाडर आणि सेक्रटरी अतुल चौधरी यांना युथ व्हिजन वेलफेयर सोसायटी संल्गन नेहरू युवा केंद्रतर्फे युवा गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा वितरण समारंभ गुरुवारी २८ जुलै दुपारी १ वाजता सहारांपूर उत्तर प्रदेश येथे पार पडला.
या प्रसंगी भारतातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या ३० युवकांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. माजी खासदार राघव लखनपाल शर्मा आणि आणि आमदार देवेंद्र कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मागील ६ वर्षांपासून विविध सामाजिक क्षेत्रात द युथ ऑफ टुडे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था कार्यरत आहे.आदिवासी पाडा येथील मुलांचे शिक्षण, दररोज २०० पेक्षा जास्त मुलांना पौष्टिक आहार त्याचबरोबर आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप,नदी आणि तलाव स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण शिबीर इ. कार्यक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. या कामांचा विचार करत युथ व्हिजन वेल्फेअर सोसायटी फाउंडेशन आणि नेहरू युवा केंद्रातर्फे हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.