आज दिनांक 31 /10/ 2022 रोजी
मा.तहसीलदार साहेब याना निवेदन.
जिंतूर तालु्यातील काँगेस पक्ष्यांच्या वतिने एक दिवसीय धरणे आंदोलन या संदर्भात निवेदन देण्यात आले. दिनाक17/10/2022रोजी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिंतूर तहसिल कार्यालयात निवेदन सादर केले होते.या मध्ये 1) जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाद्वारे 100% विमा संरक्षण रक्कम देण्यात यावी.2) 2018 चे 33% पेक्षा अधिक नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली होती परंतु त्यात काही मंडळाचे रखडलेले अनुदान 63 कोटी 31 लाख 67 हजार त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावे.3) जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये पाऊस न पडल्याने 35 दिवसाचा खंड पडला होता आणि मागील महिन्यात भरात अतिवृष्टीने घासी आलेल्या सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झालेले आहेत या अतिवृष्टीने संपूर्ण पिकाचे नुकसान झालेले करिता प्रत्येक मंडळात सरसकट पंचनामे करून प्रत्येक एकर 13600 प्रमाणे 3 हेक्टर पर्यंत जारी केलेली मदत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी. या निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिली होते परंतु अद्यापही कुठलीही कार्यवाही कुठलीही मदत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली नाही म्हणून 1/11/ 2022 रोजी आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या मागणीचे निवेदन आज तहसीलदार साहेबांना देण्यात आले यावेळी जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख जिल्हा परिषद सदस्य अविनाश राव काळे सभापती राजेंद्र नागरे शेतकरी संघटनेचे नेते पाशा चांद पाशा पवन भालेराव आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते