पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यासह बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असुन त्यामध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुनही शासन ऑनलाइन तक्रार करण्याचा फास करीत करीत असुन या किचकट प्रक्रियेला शेतकरी मेटाकुटीला आला असुन पाहणी दौरा व पंचनाम्याचे फास न करता पुर्ण बीड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर करावा म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा तालुका कौन्सिल पाटोदा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटोदा तहसीलवर बोंबमारो मोर्चा काढला मोर्चाचे नंतर सरकारच्या निषेध सभेमध्ये रुपातर झाले यानंतर पाटोदा तहसिल मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, मा.बीड जिल्हाधिकारी यांना तहसिल मार्फत निवेदन देण्यात आले.यामध्ये १) पाटोदा तालुक्यासह बीड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा
२)शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजारांचे नुकसान भरपाई द्या ३)पीक विमा कंपनीच्या जाचक अटी त्वरित रद्द करा.
४)आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत मदत द्या. व त्यांना घरकुल, श्रावणबाळ, आदी योजनेची त्वरित अमलबजावणी करा ५) २०पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित परत घ्या ६) शेतकऱ्यांचा २०२०चा खरिप मंजूर पिकविमा त्वरित जमा करा
७)संजयगांधी,श्रावणबाळ, महिला परिक्त्या यांचे मानधन दिपावली पुर्वी खात्यावर जमा करा ८)शेतमजूरांना सुध्दा केंद्र सरकारने त्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांप्रमाणे प्रतिमहा १ हजार रुपये जमा करावे.९) शेतकऱ्यांना पंचनाम्याची अट न लावता सरसकट नुकसान भरपाईचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा. १०) शेतकऱ्यांचे नुकसानीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने तहसील कार्यालयात दाखल करून घ्यावे.आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी कॉ.महादेव नागरगोजे, भाई विष्णुपंत घोलप,यांच्या सह शेतकरी कामगार पक्षाचे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.