माजलगावात ठाकरे गटाला हाबाडा उपनगराध्यक्ष तुकाराम येवले एकनाथ शिंदेंच्या पाठीशी 

______________

 जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्याउपस्थितीत केला प्रवेश

_____________

 युवकांचे संघटन करण्यावर देणार भर ----तुकाराम येवले 

_______________

माजलगाव दि.30 (प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या विचारांची प्रेरणा घेत माजी नगराध्यक्ष तुकाराम येवले यांनी कार्यकर्त्या समवेत आज दिनांक 30 आँक्टोबर 2022 रोजी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख नितीन मुंदडा,जिल्हा संघटक योगेश नवले, यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे .

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शहरातील जय हिंद नगर भागातील श्रावण क्षीरसागर या सहा वर्षीय बालकाची दखल घेत त्याला उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली .आज क्षीरसागर कुटुंबियांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या उपस्थितीत माजी उपनगराध्यक्ष तथा बहुजन समाजाचे नेते तुकाराम येवले यांनी जाहीर प्रवेश केला आहे यावेळी बोलताना मुळूक म्हणाले की तुकाराम येवल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चितच बळ दिले जाईल .यावेळी बोलताना तुकाराम येवले म्हणाले की ,राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सर्वसामान्य माणूस व शेतकरी केंद्रबिंदू मानत विकास कामाचा धडाका सुरू केलेला आहे बाळासाहेब ठाकरे व अनंत दिघे यांच्या विचाराचा वारसा अविरतपणे समर्थपणे आज चालवत आहेत त्यांच्या विचारांची प्रेरणा घेत आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून आगामी काळात पक्ष बांधणी सोबतच युवकांचे मोठ्या प्रमाणावर संघटन करत काम करणार आहे यावेळी जेष्ठ शिवसैनिक वैजनाथ चव्हाण, व बाळासाहेब गवारे या देखील प्रवेश केला.

       या कार्यक्रमास माजी नगरसेवक मच्छिंद्र मामा काळे, विजय मौजकर,उपतालुकाप्रमुख निलेश कांबळे,युवासेना तालुका प्रमुख अभिजित कोंबडे, सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर कुलकर्णी, पप्पू डुकरे,आदिनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार दत्ता महाजन यांनी केले.