रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे , शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल कडून निवडणूक लढवली जात आहे या निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे
जनतेच्या समस्या सोडवण्याच्या वेळी गायब असलेले नेते आता भल्या पहाटेच कोठेही उगवत असून निवडणुका आल्यानंतर त्यांना जनतेची आठवण होते अशी टीका शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विरोधकांवर केली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार निमित्त आयोजित सभेत शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार बोलत होते, याप्रसंगी शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, प्रकाश पवार, उपसभापती विश्वास ढमढेरे, शिक्रापूरचे उपसरपंच विशाल खरपुडे, माजी उपसरपंच मयूर करंजे, रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण करंजे, राष्ट्रावादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, सोमनाथ भुजबळ, निलेश थोरात, गौरव करंजे, रमेश भुजबळ, बाबासाहेब सासवडे, उद्योजक अमर करंजे, गणेश चव्हाण, काकासाहेब चव्हाण यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार म्हणाले विरोधक फक्त शिरुर तालुक्यातील जमिनी लाटण्यात व्यस्त आहेत, आम्हाला त्रास देण्यासाठी निवडणूक सुरु असताना देखील आमच्या चौकशा लावण्याचे तसेच आम्हाला नोटीस देण्याचे प्रकार सुरु आहेत, त्यांच्याकडून जातीपातीचे राजकारण होत असून यापूर्वी त्यांनी त्यांच्या काही संस्था बुडवल्या आणि बंद पाडल्या त्यामुळे ज्यांना संस्था आणि स्वतःचे प्रपंच चालवता येत नाही ते काय कारखाना चालवणार अशी देखील टीका आमदार अशोक पवार यांनी विरोधकांवर करत रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गायकवाड यांनी केल तर प्रास्ताविक घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण करंजे यांनी केले तर माजी उपसरपंच मयूर करंजे यांनी आभार मानले.