शेतात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शाँक लागून मृत्यू
"थेरगाव शिवारातील दुर्देवी घटना"
पाचोड(विजय चिडे) शेतातिल पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या एका वीस वर्षीय तरूणांस विजेचा जबरदस्त शाँक लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी( दि.३१) रोजी सकाळच्या सुमारास घडली असून गणेश भाऊसाहेब जाधव(वय२०) असे शाँक लागून प्राण गमवलेल्या तरुणाचे नाव आहे.
जाधव यांची थेरगाव शिवारात त्याची शेती असून सध्या पिकाला पाणी देण्यासाठी गणेश जाधव हा पाहटेच्या दरम्यान शेतात गेला होता.पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी बटन दाबत असतांना अगोदर पासून विद्युत प्रवाह उतरलेला त्याच्या लक्षात न आल्याने हाताचा स्पर्श लागताच गणेशला जोरदार शाँक लागला व तो जमीनीवर कोसळलेला होता. त्याचे नातेवाईक शेतात गेले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशला ताबडतोब पाचोड पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डाँ.नोमान शेख यांनी तपासून मृत घोषीत केले. तसेच उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान या घटनेची वार्ता कळताच नातेवाईकासह मिञ मंडळींनी ग्रामीण रुग्णालया समोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीटजमादार किशोर शिंदे हे करीत आहेत.