रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.