रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील बांबवडे येथे बेळगाव हून रत्नागिरीला येणाऱ्या एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. ही घटना रविवार दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. या अपघातात २ वाहनांचे नुकसान झाले असून बस चालकाच्या प -संगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण वाचले.
सविस्तर वृत्त असे की, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी बेळगाव येथून प्रवाशांना घेऊन निघालेली हुबळी- कोल्हापूर - रत्नागिरी बस बांबवडे येथे आली असता बसचे ब्रेक निकामी झाल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले. त्याने प्रवाशांना याची कल्पना दिली. त्यानंतर ड्रायव्हरने समोरून येणाऱ्या वाहनांनाही ब्रेक फेल झालेत बाजूला व्हा असे ओरडून सांगत होता. प्रवाशांचा जीव घाबरला होता. आता होणार काय? मात्र बांबवडे येथे एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ही बस थांबली नाही. त्यानंतर पुढे कारखान्यात उस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली. तरीही गाडी थांबत नव्हती. शेवटी त्याने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वेग कमी झाल्यामुळे थांबली. ही घटना दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. प्रवाशांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकला. मात्र या बस मध्ये कोल्हापूर बस स्थानकात एका अपंग मुलीला दोघांनी गाडीत आणून बसवले होते. तिला उठता किंवा चालताही येत नाही. तिला गाडीत बसवल्यानंतर नातेवाईक कोल्हापुरातून निघून गेले. मात्र अपघातानंतर या मुलीच काय झालं याबाबत काहीच समजू शकले नाही.