बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या जिल्हा युवा सेना प्रमुख पदी रवी भांदुर्गे यांची नियुक्ती झाल्याने युवा शिवसैनिकमध्ये चैतन्याचे वातावरण झाले असून कार्याचा उत्साह वाढला आहे.
शिवसेना नेत्या तथा खासदार भावनाताई गवळी व जिल्हा प्रमुख महादेवरावं ठाकरे यांनी रवी भांदुर्गे यांची नियुक्ती केली असून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराने प्रेरित होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्वलंत हिंदुत्व वादि विचारसराणीचे काम करित असल्यामुळे आणी वाशीम जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेची पाळे मुळे घट्ट करण्यासाठी युवकांना प्रेरित करून पक्षाला बळकटी आणण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.