औरंगाबाद : वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक उभारणार असल्याची घोषणा मंत्री संदिपान भूमरे यांनी केली आहे. संदिपान भूमरे यांनी पैठणमध्ये दिवाळीनिमित्त कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली.पैठणमधील या कार्यक्रमात संत-महंतांनी मठांचा विकास करण्याची मागणी केली. यावर उत्तर देतांना संदिपान भूमरे म्हणाले की, प्रत्येक मठाला भेट देऊन त्याच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे. पैठण घाटावरती आरती, एकनाथी भागवत मंदिर आणि वारकऱ्यांसाठी स्वंतत्र बँक सुरु करु, असं आश्वासन भूमरेंनी दिलं.दरम्यान, वारकऱ्यांसाठी बँक सुरु करणार असल्याचं मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितलं. मात्र या बँकेचं स्वरुप नेमकं कसं असणार? याबाबत मात्र अध्याप सांगण्यात आलं नाही. तर वाकऱ्यांसाठी बँकेची उद्दिष्ट काय असतील? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत