टेम्पोमध्ये 35 बैल कोंबून वाहतूक होत असल्याची माहिती नेकनूरचे प्रभारी ठाणेप्रमुख सपोनि विलास हजारे यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून 35 जनावरांची सुटका करत एका टेम्पोसह 34 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल रात्री 10 वा. करण्यात आली.
नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका टेम्पोमध्ये तब्बल 35 जनावरे कोंबून ती परराज्यात पाठवत असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ नेकनूर ते केज रस्त्यावरील येळंबघाट येथे उड्डाणपुलावर सापळा लावला. यावेळी कंटेनर क्र.(के.ए.51 ए.डी.9009) याला थांबवून त्याची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 35 जनावरे आढळून आले. त्याची सुटका करत पोलिसांनी 34 लाख 10 हजाराचा एकूण मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नेकनूर पोलिसात प्रभाकर एस.सुब्रमण्यम रा.तामिळनाडू आणि के.मोहन सुंदरम कितुचामी रा.केरळ, एम.कोबल रा.तामिळनाडू, व्ही.मुर्ती रा.तामिळनाडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रमुख विलास हजारे, पोलिस उपनिरीक्षक जाधव, अनवणे, ढाकणे, मारूती कांबळे आदिंनी केली.