दि १० रोजी दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान भुई गल्ली खंडोबानगर या ठिकाणी डुकरामुळे होणार्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांमध्ये बैठक सुरू असताना यातील आरोपी यांने फिर्यादी महिला व इतरांबरोबर बैठकीमध्ये वाद घालत मारहाण केली.
त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सदर महिला हिने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने सचिन हरिचंद्र पवार ,बापू नाना पवार, प्रशांत हरिचंद्र पवार ,अजय सुरेश पवार ,लाला गणपत पवार ,गणेश काळे, भुऱ्या राजू पवार ,लक्ष्मी लाला पवार, वैशाली पोपट पवार या लोकांच्यावर बेकायदा जमा जमवणे मारहाण करणे महिलांचा विनयभंग करणे जबरदस्तीने मोबाईल चोरून येणे. अल्पवयीन मुलीला लज्जास्पद मारहाण करणे. या साठी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपींच्या शोधासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील हे करत आहेत.