बीड : (दीपक परेराव) बीड येथील गोरे वस्तीतील वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरे वस्तीतील वंचित दुर्बल घटकातील अनाथ निराधार मुलांमुलींना शैक्षणिक साहित्याचे किटचे वाटप केले. या कार्यक्रमाप्रसंगी टॅक्स प्रँक्टिंशनर आणि शासकीय प्रामाणित ऑडिटर शेख शिराज सुजाउद्दीन (इनामदार) म्हणाले की, औरंगाबाद येथील बोधी ट्री फाउडेंशनच्या वतिने वंचित दुर्बल घटकातील गरजु व होतकरू मुलामुलींना दरवर्षी विविध राज्यात शाळेय किट वाटप करुन आपण करत असलेली ही मदत एखादयाचे जिवन बदलु शकते असे उद्गार शेख सिराज सुजाउद्दीन (इनामदार) यांनी केले. 

          पुढे कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांबळे म्हणाले की वंचित दुर्बल घटकातील या समाज बांधवाना शैक्षणिक वस्तु रुपी भेठ दिली हीच खरी दिवाळी आहे.बोधी फाउंडेशनच्या वतिने वंचित दुर्बल घटकातील गरीब होतकरू मुला मुलींना मोफत शालेय साहित्य बॅगसह संपुर्ण किट वाटप करून या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत आहात अभिमान वाटला.

    यावेळी व्यासपीठावर शेख शिराज सुजाउद्दीन इनामदार, ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांबळे, नगरसेवक शेख अफराज शेख, जहीर, शेख साजिद, दिलीप राऊत, समाज सेवक सय्यद जावेद अली, फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे,मीरा वाघमारे,देविदास बुधवंत यांची उपस्तीती होती.

      यावेळी दत्ता राऊत यांनी बोलतानां म्हटले की वंचित दुर्बल घटकातील मुले हे परस्तीतीमुळे पुढे शिकू शकत नाही. परंतु बोधी फाउंडेशन ही संस्था या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठे काम करत आहे. अशा या वंचित मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या पुढे आमच्याही संस्थेचे योगदान असेल. गोरे वस्तीतील वंचित दुर्बल घटकातील मुला मुलींना नगरसेवक शेख आफराज मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की,अनेक लोक आज दिवाळी साजरी करत आहेत परंतु बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन ही संस्था राज्यभर जिल्हा प्रतिनिधीच्या माध्यमातून वंचित दुर्बल घटकातील मुला-मुलींना शोधून त्यांना शैक्षणिक साहित्याची किट वाटप करून अशा वंचित दुर्बल घटकातील मुला मुलींना शाळेच्या प्रवाहात आणत आहेत ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.

पालात राहणारे वंचित दुर्बल घटकातील भटक्या समाजातील अनेकजण आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहतात. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने वंचित दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत केली जात आहे.

 *शेख शिराज सुजाउद्दीन (इनामदार)-

टॅक्स प्रँक्टिंशनर आणि शासकीय प्रामाणित ऑडिटर

 बोधी फाउंडेशनने दिलेल्या एक हात मदतीचा शैक्षणिक किट दिल्याबद्दल मी ऋणी आहे. यापुढील काळातही मी हीच सामाजिक बांधिलकी जपत वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत करेन. 

 - मुस्कान सलीम पठाण- विद्यार्थिनी बीड -  कार्यक्रमासाठी फाऊंडेशनचे ऋत्विक उर्फ जीवन वाघमारे, व सहकारी आणि परिसरातील समाजसेवक सय्यद जावेद अली उपस्थित होते. या मुलांना मदत मिळवून देण्यासाठी दत्ता राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले. या मदतीबद्दल गोरे वस्तीतील नगरसेवक शेख अफराज यांनी सर्वांच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमासाठी शेख आयुब, शेख जहीर,शेख साजिद, ढवळे लखन उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास बुधवंत यांनी केले तर आभार शेख यांनी मानले