पाथरी (प्रतीनीधी)रात्री गस्तीवर असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहीतीवरुन २९ आक्टोबर शनिवारी रात्री स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका काळ्या रंगाच्या स्काॅर्पीओ जिपचा पाठलाग करुन पोहे टाकळी येथे झडती घेतली असता चौदा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा गाडीसह मुद्देमाल हस्तगत करत पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 सविस्तर बातमी अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी गस्तीवर असताना दिनांक 29/10/2022 रोजी रात्री मा. पोलीस अधीक्षक रागसुधा मॅडम यांचे आदेशाने व पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण स्था गु.शा. परभणी यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार रवी जाधव ,विलास सातपुते ,मधुकर ढवळे ,पिराजी निळे यांचे पथक पोलीस स्टेशन पाथरी हद्दीत अवैध्य धंद्याची माहिती काढून केसेस करणे कामी पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका स्कार्पियो मधून पाथरी येथे गुटखा घेऊन येत आहे अशी बातमी मिळाल्या वरून पी. पी.एल. ग्राउंड पाथरी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला सापळा रचून थांबले असता एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओ ला पथकाने हात दाखवले असता न थांबता भरधाव वेगाने पोहेटाकळी कडे जात असताना दिसल्याने पथकाने सदर वाहनाचा पाठलाग करत असताना संशयित वाहने हे चालकाने पोहेटाकळीत गावात रस्त्यावर उभा करून चावी घेऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पथकाने स्कार्पिओ ची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा गुटखा किंमती 6,43,500 रुपये व एक स्कॉर्पिओ किंमतीची 8,00,000,रुपये.असा एकुण 14,43,500 रु.चा मुद्देमाल पथकाने छापा टाकून जप्त केला आहे . सदर प्रकरणी स्कॉर्पिओ क्र.MH 06 AS 4471 चा चालक व मालकाविरुद्ध पोलीस अंमलदार रवी जाधव यांच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.