नाचनवेल परिसरात मक्का सोंगणी व रब्बी पेरणीच्या कामांना वेग कन्नड तालुक्यातील नाचनवेल, चिंचोली परिसरात दिवाळीनंतर शेतीच्या कामांची  कापूस वेचणी, मका सोंगनी कामांची लगबग सुरू झाली आहे. दोन्ही कामे एकाच वेळी आल्याने मजुरा अभावी शेती कामे विलंब होत आहे. नाचनवेल परिसरात बाहेर गावातील मजूर मोठ्या प्रमाणावर आणावे लागत आहे. त्यात मजुरांना मनमानी पैसे द्यावे लागतात. थंडीचा मौसम सुरू झाला असल्याकारणाने काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मकाचे शेत  तयार करत आहे. तर काही ठिकाणी यंत्राच्या साह्याने गहू, हरभरा पेरणीला सुरुवात झाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टी असल्याने आई-वडिलांना शेतीकामात मदत करीत आहे .