औरंगाबाद : विधानसभेचे माजी अध्यक्ष , फुलंब्रीचे भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी नुकताच विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला . ७५ वर्षांच्या वरील व्यक्तींना उमेदवारी न देण्याचे भाजपचे धोरण आहे . याची जाण असल्याने २०२४ मध्ये ८० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बागडेंनी हा निर्णय व्यक्तिगत पातळीवर जाहीर केला . त्यामुळे आता या मतदारसंघावर दावा असणाऱ्या भाजपच्या दुसऱ्या फळीतील इच्छुकांना मनातून आनंद झाला . पण सामान्य कार्यकर्त्यांकडून मात्र हा निर्णय मागे घेण्यासाठी बागडेंकडे आग्रह धरला जात आहे . आ . बागडेंच्या कॅनॉट येथील कार्यालयात शुक्रवारी ( २८ ऑक्टोबर ) औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती . निवृत्तीचा निर्णय मागे घ्या , असे साकडे कार्यकर्ते घालत होते . मात्र ‘ आमदार नसलो तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण जनसेवेत सक्रिय राहणार आहोतच , ' असे सांगून बागडे कार्यकर्त्यांची समजूत घालत होते . निवडणुकीच्या दीड - दोन वर्षे आधीच निवृत्तीची घोषणा केल्याने कार्यकर्त्यांची मानसिकता तयार होईल . हा निर्णय आपला वैयक्तिक आहे . पक्ष जो अंतिम निर्णय देईल तो आपल्याला मान्य असेल , असेही बागडेंनी नमूद केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जयपुर में फर्जी डिग्रियों की 'फैक्ट्री', 16 यूनिवर्सिटियां भी शामिल:6 राज्यों में फैला नेटवर्क
जयपुर के प्रताप नगर स्थित ई-मित्र पर करीब 18 दिन पहले छापा मारा गया था। इसमें 16 निजी...
*बोरी येथील जैन वाचनालयाच्या वर्धापन* *दिनानिमित्त महात्मा गांधींची वेशभूषा स्पर्धा संपन्न*
जनता न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी माबुद खान
बोरी येथील जयकुमारजी जैन सार्वजनिक*...
জিলা পয্যায়ৰ পঞ্চম পোষণ মাহ ২০২২ আৰু মাত্ৰু বন্দনা সপ্তাহ ২০২২ৰ শুভ উদ্বোধন
সোমবাৰে তিনিচুকীয়া জিলা উপায়ুক্ত কায্যালয়ৰ সভাগৃহত জিলা পয্যায়ৰ পঞ্চম পোষণ মাহ ২০২২ আৰু মাত্ৰু...