राज्यात सक्षम लोकआयुक्त कायदा करा, अन्यथा आंदोलन

तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी

  राज्यात सक्षम लोकआयुक्त कायदा होण्यास विलंब होत असल्याने आंदोलन करण्यात येणार असुन, त्याबाबतचे निवेदन नुकतेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास निमगाव म्हाळुंगी(ता.शिरूर) शाखेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

     राज्यात भ्रष्टाचार होत असून त्याचा गोरगरिब जनतेला मोठा फटका बसत असल्यामुळे २०११ मध्ये दिल्ली येथे आंदोलन झाल्यामुळे केंद्र स्तरावर सक्षम लोकपाल आणि प्रत्येक राज्यात सक्षम लोकआयुक्त कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असताना २०१४ मध्ये केंद्रात लोकपाल कायदा लागू झाला त्यानुसार प्रत्येक राज्यात सक्षम लोकआयुक्त कायदा होणे गरजेचे असताना देखील महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला नाही. त्यांनतर पुन्हा २०१९ मध्ये राळेगणसिद्धी येथे आंदोलन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले मात्र अद्यापही कायदा झाला नाही, त्यामुळे आता हा कायदा होण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास समितीने पुढाकार घेतला आहे. तातडीने सक्षम लोक आयुक्त कायदा लागू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. 

यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास निमगाव म्हाळुंगी शाखेचे अध्यक्ष किरण थोरात, शिवाजी खेडकर, किरण लांडगे, स्वप्नील चव्हाण, अक्षय गायकवाड, रत्नदीप गाडेकर, अँड. आदित्य करपे आदि उपस्थित होते.