बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे पोस्ट ऑफिस कार्यालय मार्फत अपघाती विमा पॉलिसीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी 18 ते 65 वयोगटातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे डाक अवेक्षक भोंडवे संतोष यांनी सांगितले. या योजना मध्ये अपघात मुत्त्यु झाल्यास 10 लक्ष रुपये, कायम अपंगत्व आल्यास 10 लक्ष रुपये, दवाखाना श्रेणी खर्च 60 हजार रुपये, मुलांना शाळेचा शिक्षण खर्च 1लाख रुपये, दवाखान्यात अँडमीट असे पर्यंत दररोज 1000 एक हजार रुपये 9 दिवसांपर्यंत, तसेच Opd खर्च 30000 रुपये पर्यंत मिळतो. अपघातात पॅरालिसस झाल्यावर 10 लक्ष रुपये तसेच कुटुंबातील व्यक्तींना प्रवास खर्च 25000 रुपये पर्यंत मिळतो या विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन केले यां प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ह. भ. प. नाना महाराज बेदरकर, नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा, बालाप्रसाद जाजु चेअरमन, हानुमान पाटील देवकते, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ओमप्रकाश गिरी सर, बाजीराव ढाकणे, नारायण देवकते माजी चेअरमन ढेकणमोहा, पोष्ट मास्टर जाधव सवीता, अश्वीनी वंजारे, महादेव थापडे, ज्ञानेश्वर महाराज भिसे, सुरेशं देवकते, अँड नितीन शिंदे, चत्रभुज थापडे, ज्ञानदेव देवकते, हरीश अडाणे, भिमाशंकर होन्डंरे, अरून शिंदे, सचिन शिंदे, पोपट शिंदे, भगवान शिंदे, जगन्नाथ थापडे, विनोद शिंदे, नवनाथ काळे, अरविंद शिंदे, विकास देवकते आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.