दापोली : निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीने आधीच उदध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम बॉक्साईट उत्खनामुळे उंबरशेत रोवलेत होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी तीव्र आंदोलनाच्या तयारी आहेत.
दापोली तालूक्यातील उंबरशेत तसेच रोवले या महसूली गावाच्या हद्दीत बॉक्साईट उत्खननाचे काम सन 2005 मध्ये सुरू झाले. मात्र पर्यावरणाचा -हास होणाऱ्या या उद्योगामुळे उंबरशेत रोवलेचा परिसर भकास होत गेला. हे लक्षात आल्यावर येथील जागृत नागरिकानी एकत्र येवून येथील बॉक्साईट उत्खननाचे काम बंद पाडले. बंदस्थितीत असलेल्या या उद्योगाने परत एकदा डोके वर काढले असून बॉक्साईट उत्खनन सुरू करण्याचा घाट कंपनीकडून घातला जात आहे. याला मात्र येथील शेतक-यांचा तीव्र विरोध आहे.