जिंतूर तालुक्यातील भोगाव येथे जिंतूर -औंढा राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील खड्डे,आणि नवीन रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुमारे दीड तास चाललेल्या या रास्ता रोको मुळे दोन्ही बाजूला वाहनांची लांब लांब रांग लागली होती.