धोंडराई गावात हिंदु-मुस्लिम भाईचाऱ्याची अखंड परंपरा आहे. गेल्या 5 वर्षांपासून या परंपरेला वृद्धिंगत करण्याचे काम याठिकाणी होत आहे. गावातील मुस्लिम बांधव रमजान ईदच्या निमित्ताने सर्व धोंडराईकरांसाठी मशिदीमध्ये शिरखुर्म्याचे आयोजन करतात. तर गावातील हिंदू बांधव दिवाळीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करतात.दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली आई धोंडराई ग्रुप, संत निरंकारी मंडळ, धोंडराई व समस्त धोंडराईकरांच्यावतीने धोंडराई गावातील मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनाचे हे सलग 5 वे वर्ष आहे.
खरे तर सद्यस्थितीत समाज वेगवेगळ्या जातीय व धार्मिक स्थित्यंतरातून जात असताना धोंडराई गावातील या बांधवांनी हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
याप्रसंगी हिंदू मुस्लिम भाईचारा व बंधूभाव व्यक्त करणारी मनोगते उपस्थित बांधवांनी व्यक्त केली. यात शफीक काझी, उद्धव कोकाटे, महेंद्र खरात, हसन काझी, सैफुल्ला सिद्दीकी यांनी आपली भावपूर्ण मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज करपे यांनी केले.
या फराळाचे आयोजन आपली आई धोंडराई ग्रुप, संत निरंकारी मंडळ, धोंडराई व समस्त धोंडराईकर यांच्या वतीने करण्यात आले होते.या दिवाळी फराळ कार्यक्रम प्रसंगी हभप रघुनाथ महाराज निंबाळकर, सरपंच अशोक वंजारे, तलाठी राजेश राठोड, चेअरमन नारायण नवले, आपली आई धोंडराई ग्रुपचे तात्यासाहेब मेघारे, विक्रम खरात, शिवाजी गायकवाड, बप्पासाहेब काळे, अनिल काकडे, पत्रकार तुकाराम धस, पत्रकार शाम जाधव, भास्कर खरात, संतराम काळे, शिवाजी भोसले, रमेश साखरे, किरण खरात, सचिन खरात, राहुल खरात, गौरव खरात, अक्षय खरात, संतोष जाधव, मच्छिंद्र सपकाळ, संदीप निकम, शीतल साखरे, कबीर काझी, डॉ. हबीब काझी, आजम शेख, अक्रम काझी (महाराष्ट्र ऑप्टिकल्स गेवराई), मुशाहेद काझी (जिल्हा अध्यक्ष ऊर्दु शिक्षक संघटना), इरफान शेख, इरफान इनामदार, इलियास काझी, आमेर काझी आदी गावातील हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच गावातील सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठीत, कर्मचारी, युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल इनामदार, सोमनाथ कोकणे, युवराज राजपूत, आपली आई धोंडराई ग्रुपचे सर्व सदस्य व संत निरंकारी मंडळाचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.